सुवर्ण दिप वृत्तसेवा, मुक्ताईनगर : खामखेडा व मुक्ताईनगर शहरालगतच्या पूर्णा नदीवरील खामखेडा पुलावरून अभिषेक गजानन (वय २२, अभिषेक महाजन रा. मेळसांगवे) या औरंगाबाद येथे खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह सापडलेला नव्हता.[ads id="ads2"]
पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून नदी पात्रात मृतदेह शोध कार्य सुरू होते.तरुणाने खामखेडा पुलावरील कठड्यावर मोबाईल, पाकीट ठेवलेला असून साईटला त्याची दुचाकीदेखील लावलेली होती.महाजन याने नदीत उडी घेतल्याचे एका दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याने पाहिले. त्यातच तो प्रकार पाहून दांपत्य घाबरले असल्याचे माहिती मिळाली.पुढे त्याच दुचाकी स्वाराने काठड्यावरील मोबाईलवरून अभिषेकच्या मित्रांना माहिती दिल्याचे समजते.

