बामणोद येथील उमेश उर्फ जितू केदारे या तरुणाचा गावठी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात धडक दिली होती व निवेदन दिले. मंगळवारी पोलीस पथकाने बामणोद येथे दोन ठिकाणी धाडी घातल्या.[ads id="ads2"]
त्यात एका वस्तीमध्ये गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून धाड टाकली. विजय दिनकर अढायगे हा मुद्देमाल सोडून पसार झाला त्याच्या ताब्यातून१२५० रुपयाची गावठी दारू हस्तगत करण्यात आली तर दुसऱ्या ठिकाणीही धाड टाकली. पण पंकज दिलीप जावळे हा त्याच्या ताब्यातील देशी-विदेशी दारू सोडून फरार झाला. त्याच्याकडून ३,५५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे.
न्हावी येथे तळेगाव वस्तीवर हबिब खलील तडवी हा गावठी दारू विकत असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीची १० लीटर दारु हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धाडी सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मसलोउद्दीन शेख, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, किरण चाटे, उमेश सानप, महेश वंजारी, देविदास सूरदास, महेंद्र महाजन यांनी टाकल्या.

