फोरवे वर होटेल चंदनसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत उदळी येथिल एक जण ठार झाला आहे. दिप नगर येथुन कामावरून घरी जातांना घडला अपघात उदळी गावावर शोककळा पसरली आहे.[ads id="ads1"]
वरणगाव येथुन जवळच असलेल्या दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कर्मचारी कामावरून रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी उदळी ता. रावेर येथे मोटर सायकलीने जात असतांना चौपदरी महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.[ads id="ads2"]
याबाबात मिळालेली माहिती अशी की उदळी ता रावेर येथील रहिवाशी सचिन चिंतामन चौधरी (२५) हे दिपनगर औष्णीक विज केंद्रात कामाला होते. ते आपले काम संपवून त्यांच्या मोटरसायकल क्र एम एच १९ बी एफ ०३६२ ने रात्री ११ चे सुमारास नवीन चौपदरी महामार्गावरून उदळी येथे जात असताना महामार्गावरील हॉटेल चंदन समोर अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जबर धडक दिल्याने त्याचा करुण अंत झाल्याची घटना घडली. मयत सचिन याचे नुकतेच आठ दिवसांपुर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी गुरुवारीच घरी आली होती. त्यामुळे आजच सासरी आलेल्या वधुच्या जीवनात दुर्दैवाने वैधव्य प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या निधनाने उदळी गावावर भयंकर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला हरेश पंडित चौधरी यांच्या खबरीनुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास एपीआय आशिष अडसुळ यांचे मार्गदर्शना खाली पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे.

