मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांनी खुनासाठी घेतले गावठी पिस्तूल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 सावदा पोलिस (Savda Police Station)ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खिरोदा गावातील चौधरी कोल्ड्रिंगसमोर गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली. यापैकी एक आरोपी औरंगाबाद (Aurangabad) आणि दुसरा कुऱ्हे पानाचे येथील रहिवासी आहे. [ads id="ads1"] 

  नाशिक आयजींचे(IG) पथक व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे नात्यातील एका मुलीवर अत्याचार करणारे दोघे जामीनावर बाहेर आले. त्यांना ठार करण्यासाठी हे पिस्तूल आणल्याचे समोर आले. खिरोदा (Khiroda) गावात पालकडून एमएच. २०-बीडब्ल्यू. ५५२० या दुचाकी वाहनाने येणारे अनिल बद्री कच्छवा (रा. पानाचे कुऱ्हे, ता. भुसावळ) आणि गणपत भिकन शेजुळ (रा. अंजनडोह, औरंगाबाद) हे गावठी पिस्तूल घेऊन खिरोदा गावात येत असल्याची माहिती नाशिक आयजीच्या पथकाला मिळाली. [ads id="ads2"] 

  त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून चौधरी कोल्ड्रिंगसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांना पकडले. या पथकातील एएस‌आय बशीर तडवी, रामचंद्र बोरसे यांच्यासह सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, मनोज हिरोळे, संजय चौधरी, ममता तडवी, यशवंत टहाकळे यांनी दुपारी २ वाजता ही कारवाई केली. दोघांकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस, दुचाकी, एक मोबाइल हस्तगत केला. दोघांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. आकाश बाबासाहेब सिंगारे व अफजल उस्मान शाहा यांनी नात्यातील १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ते जामिनावर सुटल्याचा राग आल्याने दोघांना ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल(Pistol) घेतल्याची माहिती संशयितांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!