नाशिक जिल्ह्यातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी वगळून सर्व शाळा दि. ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयातील बैठका ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात.
याबाबत अधिक कडकपणे महानगरपालिका आणि पोलीस विभागामार्फत अंमलबजावणी केली जाईल. सर्व विभाग व सर्व आस्थापना चालकांकडून शासन अधिसूचना दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ व यापूर्वीच्या निर्देशानुसार केली जाईल, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाकडून कारवाई केली जाईल.
लग्न समारंभ साधेपणाने आयोजित करावेत तसेच ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास आयोजक व उपस्थितांवर कारवाई करणेत येईल. सर्व प्रकारच्या यात्रा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
या आदेशात सुरु करण्यासाठी पात्र ज्या-ज्या बाबींचा नव्याने स्पष्ट उल्लेख केला आहे. केवळ त्याच बाबी नव्याने सुरु करता येईल ज्या बाबी प्रतिबंधित केल्या आहेत. त्या प्रतिबंधित राहतील, ज्या बाबींचा स्पष्ट उल्लेख या आदेशात नाही.
त्यासाठी यापूर्वी पारीत केलेल्या आदेशातील निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील, या आदेशाचा भंग करणार्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि साथरोग कायदा, १८९७ आणि भारतीय दंड संहिता, १८६० तसेच यासंदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

