नाशिक प्रतिनिधी । सुशिल कुवर
नाशिकमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ग्रामीण भागातील आकडेवारीदेखील वाढत आहे. इगतपुरी तालुक्यातील आश्रमशाळेतील सर्वाधिक मुलांना करोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे येत्या सोमवारपासून नाशिकमधील आश्रमशाळाही बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.[ads id="ads1"]
आज नाशिक जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची उपस्थिती होती.[ads id="ads2"]
कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शहर, जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, आश्रमशाळा सुरु असतील की बंद याबाबत निर्णय झालेला नव्हता. यावर आज पालकमंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील आश्रमशाळाही येत्या सोमवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत.
तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेल्या आश्रमशाळा पुन्हा दीड महिन्याच्या अंतराने बंद झाल्याने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरीच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक भागात आजही विजेचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी मुलांना उंचावर जाऊन मोबाईल रेंजमध्ये आणावे लागतात. तेव्हाच त्यांचा अभ्यास होऊ शकतो. तर अनेक भागातील शिक्षण पाड्यांवर जाऊन लॉकडाऊन काळात शिकवत होते. त्यामुळे येणाऱ्या काळात आश्रमशळेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे कसे होणार याबाबत अनेक प्रश्न पडण्यास सुरुवात झाली आहे.

