https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

रावेर शहरासह जिल्ह्यावर अवकाळीच संकट ! सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे गारठा वाढला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

  Maharashtra राज्यावर शुक्रवारपासून अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट झाली.तर आज पहाटे रावेर शहरासह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
[ads id="ads1"] 

  Jalgaon जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आज सकाळपासूनच थंडीची चाहूल पुन्हा वाढत असून आज रविवारी जिल्हात किमान तापमान १२ तर कमाल तापमान २६ अंशांवर राहणार आहे.[ads id="ads2"] 

  गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या स्थितीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. रविवारी वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून, तापमान घसरल्याने थंडीची तीव्रता वाढणार आहे.

  उत्तर महारा‌ष्ट्रात शनिवारपर्यंतच अवकाळीची शक्यता असून मराठवा‌ड्यात ९ जानेवारीपर्यंत तर विदर्भात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी हैराण असताना, या दणक्याने केळी, हरभरा, गहूसह विविध पिके संकटात आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!