जळगाव जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

अनामित

ळगाव,  : मकर संक्रांत व इतर सणांच्या वेळेस पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असल्याने या मांजाची खरेदी, विक्री करू नये,

[ads id="ads2"]

अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

   जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, पक्ष्यांना प्राणघातक ठरणारा मांजा पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनाने बंदी घातली आहे. त्याची विक्री करणे, साठविणे व वापरणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द कारवाईची मोहीम वन विभागातर्फे उघण्यात आली आहे. 

   मकर संक्रात या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक किंवा इतर कृत्रीम वस्तूंपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कायमस्वरुपी बंदी घालण्यात आलेली आहे. सदर नायलॉन मांज्याची खरेदी, विक्री करू नये. जळगाव जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी/किरकोळ व्यापारी/साठवणुकदारांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक संस्था व पोलिस विभागाने स्वतंत्ररीत्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती संस्थेने उल्लंघन केल्यास ही बाब ही पर्यावरण ( संरक्षण) अधिनियमान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.




#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!