रावेर : कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर पाच दिवसीय स्त्री जातीचे अर्भक सोडून माता पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात मातेने रस्त्याच्या साईट पट्याला लागून झुडपात हे अर्भक टाकल्याचा अंदाज आहे.[ads id="ads1"]
अनैतिक संबंधातून अर्भक जन्मल्याचा संशय रावेरकडून अहिरवाडीला जात असताना नवजात बाळाचा रडण्यात आवाज आल्यानंतर नागरीकांनी पाहिले असता स्त्री जातीचे अर्भक आढळले.[ads id="ads2"]
पंचायत समिती उपसभापती यांचे पती संदीप सवाळे यांना माहिती कळताच त्यांनी हे अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे बाळ अनैतिक जन्मल्याचा संशय असून अज्ञात मातेचा पोलिसांना शोध घेवून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

