विवरा येथील पिता-पूत्रांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 विवराफैजपूर : सहा वर्षीय मुलाला गळफास देत पित्यानेही गळफास घेत आत्महत्या (Suside) केल्याची धक्कादायक घटना फैजपूर (Faijpur) शहरातील बसस्थानकाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे शुक्रवार, 7 जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली होती. [ads id="ads1"] 

  आर्यन निलेश बखाल (6)  असे मयत मुलाचे तर निलेश घनश्याम बखाल (35, मूळ गाव रा.विवरे, ता.रावेर, ह.मु. बसस्थानकाच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर)  असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही मात्र मृत्यूपूर्वी निलेश यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात स्वःखुषीने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, मृत पिता-पूत्रांवर शुक्रवारी सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.[ads id="ads2"] 

डेअरीच्या चालकाच्या आत्महत्येनंतर फैजपूर मध्ये  मोठी खळबळ

बापू डेअरीचे संचालक असलेल्या निलेश घनश्याम बखाल (35) यांनी काही दिवसांपूर्वीच फैजपूर शहरात डेअरी सुरू केली होती मात्र शुक्रवारी सकाळी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यनसह निलेश यांचा गळफास  घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आणि विवरे गावावर शोककळा पसरली. निलेश यांनी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी फैजपूर येथे बाजारात सोडल्यानंतर ते घरी परतले व सहा वर्षीय आर्यन सह गळफास गळफास घेत आत्महत्या केली.

पत्नी घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार

बाजारासाठी गेलेल्या निलेश यांच्या पत्नी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद दिसून आला. शिवाय दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता पिता-पुत्रांचे मृतदेह पाहता त्यांना जबर मानसिक धक्का बसला. ही घटना वार्‍यासारखी फैजपूर शहरासह  विवरे गावात  पसरताच मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले असता येथील  वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश आखेगावकर व सहकार्‍यांनी घटनास्थही धाव घेत पाहणी केली.

वडिलांशी झालेले ‘ते’ संभाषण ठरले शेवटचे


निलेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक तास आधी आपल्या वडीलांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. आपण आनंदात असून पुढच्या आठवड्यात विवरा येथे येतो, असे नीलेश  वडिलांशी भ्रमणध्वनीवरून सांगितले होते शिवाय नवीन व्यवसाय चांगला सुरू आहे त्यामुळे इतर कामांसाठी वेळ मिळत नाही, असे देखील निलेश वडिलांना म्हणाला होता तर आजोबांशी मृत आर्यननेही संवाद साधला होता मात्र तासाभरातच मुलगा अन् नातवाच्या मृत्यूची बातमी विवरे गावात धडकल्याने वडील घनश्याम बखाल यांना जबर धक्का बसला तर त्यांच्या मित्र,नातेवाइकांच्या आक्रोशाने समाजमन हेलावून गेले

आत्महत्येपूर्वी लिहिली होती चिठ्ठी

मयत निलेश बखाल  यांनी आत्महत्या  करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे.आपण स्व-खुशीने आत्महत्या करीत असून त्यास कुणालाही जबाबदार धरू नये, मी आर्यनला सोबत नेत आहे, असा त्यात उल्लेख आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, पिता-पूत्रांवर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी सायंकाळी विवरे, ता.रावेर  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्टांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!