येत्या दहा दिवसांत कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार - किरीट सोमय्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

मुंबई : येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
[ads id="ads1"] 

किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी 800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत, असं सोमय्या म्हणाले.[ads id="ads2"] 

सोमय्या म्हणाले की, सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने टेरर घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे. येत्या दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करणार असल्याचं ते म्हणाले. येत्या दहा दिवसात या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर आणणार आहे, असं ते म्हणाले.< /p>

ठाकरेपवार सरकारचा नेत्यांनी कोवीड चा Terror भीती फैलवू नये. : किरीट सोमैया - १-४ जानेवारी तारखे दरम्यान मुंबईत ३३,३५२ कोरोना पॅाझीटीव्ह सापडले - पैकी २९, २७६ मध्ये लक्षण आढळून आली नाही - पैकी २३०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले - २७०२ लोकांना अवघ्या दोन/चार दिवसात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले - ओमायक्रान हा ३० ट्क्के इफेकटीव्ह असल्याचे कळते - ओमिक्रोन ची काळजी घेण्याची गरज आणि दहशतीची नाही… किरीट सोमैया

Posted by Kirit Somaiya on Tuesday, January 4, 2022

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!