Raver शहरांमध्ये मोटर सायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. मोटर सायकल चोरून देणाऱ्या चोराला चोप दिल्यानंतर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस पाठवले.[ads id="ads2"]
परंतु बाहेरर्पुयात राहणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हर च्या मुलाने चोराला पळवून लावण्यास मदत केल्याने चोर पसार झाले. पोलिसांनी तात्काळ पडून लावलेल्या इसमाचा शोध घेतला असता गाड्या चोरणारा मुलगा हा रावेर शहरातीलच आहे. या मोटर सायकल चोरा वर आधी दोन गुन्हे दाखल आहेत.
रावेर आणि विवरा अशा दोघा ठिकाणी मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. परंतु या मुलाच्या डोक्यात चक्कर पडलेला असल्याने व त्याची मुंबई येथील इस्पितळाचा औषधोपचार सुरू असल्याची फाईल आरोपींच्या आईवडिलांनी पोलिसांना यापूर्वीच दाखवलेले आहेत. या मुलाच्या डोक्यात चक्कर पडलेला असेल तर हा फक्त मोटरसायकल कशा चोरतो? आणि चोरीचे मोटर सायकल नेतो कुठे? त्याला कोण मदत करते? गाड्या चोरण्याची मोठी चैन तर नाही ना? त्याच्या डोक्यात चक्कर पडलेला असेल तर त्याला घराच्या बाहेर कसे जाऊ दिले जाते? का डोक्यात चक्कर पडल्याचे नुसते आव आणून चोऱ्या करतो. याही गोष्टी पोलिसांनी तपासण्याची गरजेचे आहे.

