अधिक माहिती अशी की, दत्तात्रय नाना पाटील रा. भामरे ता. चाळीसगाव याच्या वर पाचोरा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्याच्याविरोधात २६ ऑक्टोबर २०१९ रोजी पकड वारंट जारी करण्यात आले होते. पोहेकॉ सुभाष भिमराव पाटील यांनी आरोपी दत्तात्रय पाटील याला अटक करून चाळीसगाव पोलीस ठाण्यात आणत असतांना [ads id="ads2"] आरोपी भाऊसाहेब त्र्यंबक पाटील याने पोलीसाची अडवणूक करून "दत्तात्रय पाटील याला अटक करू नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल, मी तुमच्याविरूध्द खोटनाटे अर्ज करून बदनामी करेल" अशी धमकी देवून आरोपी दत्तात्रय पाटील याला पोलीसांच्या ताब्यातून हिसकावून पळवून नेल्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात भाऊसाहेब पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्ह न्यायालयातील न्या. व्ही.बी. बोहरा यांच्या न्यायालयात सुरू होता. खटल्याची सुनावणी शुक्रवार ७ जानेवारी करण्यात आली. यात सरकारपक्षातर्फे एकुण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यात पोलीस कॉन्स्टेब सुभाष पाटील व प्रत्यक्षदर्शी साक्षिदार यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधिशी बोहरा यांनी आरोपी भाऊसाहेब पाटील याला दोषी ठरवत सहा महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा आणि दीड हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड.भारती खडसे यांनी काम पाहिले तर केस वॉच पोहेकॉ दिलीप सत्रे व पैरवी अधिकारी जरीना तडवी यांनी काम पाहिले.

