शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-2020) (TET Exam 2020) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात 7 हजार 880 अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली.[ads id="ads1"]
अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. याचाच अर्थ शिकविण्याची योग्यता नसलेल्यांना शिक्षक बनविण्याचा प्रकार घडला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019-20 मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता.[ads id="ads2"]
याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) , शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह 30 ते 35 आरोपींना अटक करण्यात आली आहे.