भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात खंडवा, बडनेरा, नाशिक या तिन्ही मार्गावर मेमू गाडी सुरू करण्यात आली आहे. लवकरच प्रस्तावित असलेली भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेससह इतर गाड्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी दिली.[ads id="ads1"]
लाहोटी यांनी गुरुवारी मनमाड भुसावळ विभागाचा वार्षिक निरीक्षण दौरा केला, मनमाड-नांदगाव विभागात हाय स्पीड ट्रायल घेऊन निरीक्षण दौ याची सुरुवात केली. रेल हेरिटेज म्युझियमला दिली भेट
२०२०-२१ या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित केले.[ads id="ads2"]
गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढण्यात आले होते, या ठिकाणी कोच फॅक्टरी टाकण्यात येईल, असे त्यावेळेस सांगण्यात आले होते मात्र अद्यापही तेथे कुठल्याही हालचाली दिसत नाही या प्रश्नावर लाहोटे यांनी मेमू कार चेअरचा ठेका पटनाच्या एका एजन्सी ला दिला आहे. भुसावळ रेल्वे स्थानकासह, सुरक्षा, प्रवाशांची सुविधा स्वच्छता विशेष म्हणजे वाणिज्य विभागाने कोरोना काळामध्ये अनियमित प्रवाशांकडून कोट्यवधीची महसूल प्राप्त केला. याशिवाय मालवाहतूक भुसावळ रेल्वे विभाग हा अव्वल होता डीआरएम केडीयासह सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे लाहोटे यांनी कौतुक केले.
हेही वाचा :- अखेर त्या बँक व्यवस्थापकाला अटक
हेही वाचा :- ब-हाणपूर - अंकलेश्वर महामार्ग देतोय अपघातास निमंत्रण
डीआरएम एस. एस. केडिया एडीआर एम तकनीकी, नवीन पाटील, एडीआरएम प्रशासन रुक्मैया मीणा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, मंडल वाणिज्य प्रबंधक बीअरून कुमार, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक आर के शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक मुकुंद जैन, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ. ए के, सिन्हा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माध्यमांचा बहिष्कार
पत्रकार परिषदेला उशीर होत असल्याने माध्यम प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करून बहिष्कार टाकला.