ब-हाणपूर - अंकलेश्वर महामार्ग देतोय अपघातास निमंत्रण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे )  ब-हाणपूर - अंकलेश्वर महामार्ग  (Burhanpur-Ankleshwar Highway) हा मध्यप्रदेश (Madhya Pradesh) ला जोडला जाणारा महामार्ग आहे. तसेच या रस्त्यावर अपघाताची काहीही करता समस्या कमी होत नसताना वारंवार अपघाती घटना समोर येत आहे .[ads id="ads1"] 

या रस्त्याला कोणीही लक्षात घेत नसताना दिसत आहे तसेच या रस्त्यावरून खासदार,आमदार असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असो शासन-प्रशासन असो किंवा पुढारी असो सर्वच लोक या रस्त्यावरून प्रवास करत असतात परंतु कोणताही नेता असो पुढारी असो या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रारी किंवा कोणतेही प्रकारच्या अर्ज फाटे करत नसतात त्यावरून या रस्त्यामुळे होणारा दुर्घटना व त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला झेलावे लागत असतात.[ads id="ads2"] 

  त्याच अनुषंगाने या परिसरातील नागरिकांना किंवा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलर किंवा मोठे जड वाहने या रस्त्यावरून जात येत असतात या रस्त्याला रावेर तालुक्यातील (Raver Taluka) विवरे बु. विवरे खुर्द . आशा पारीक नावाने प्रसिद्ध असलेल्या पुलाच्या पुढे ते निंभोरा फाटा (Nimbhora Fata) वडगाव सावदा रोड (Savada Road) ला ब्रेकर व साईट पट्ट्या नसल्याने व साईट पट्ट्याच्या खोलीकरण झाल्याने विविध वाहन धारकांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे व मोठी कसरत करावी लागत आहे. 

हेही वाचा :- अखेर त्या बँक व्यवस्थापकाला अटक 

त्यातच एकही वाहन धारक सरकारला त्याचा कर भरल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही त्याचे दर जे लक्षात येते की गाडी घेतली त्या गाडीमध्ये डिझेल किंवा पेट्रोल इतर इंधन भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ शकत नाही तोच कर सरकारला जातो तरीसुद्धा सरकार या छोट्यामोठ्या रस्त्यांना दुर्लक्ष करून स्वतःचा फायदा घेत दिसून येत आहे .रस्त्याला साईडट्या नसल्याने पावसाळा असो हिवाळा असो या उन्हाळा असो मात्र अपघात झाल्याशिवाय राहत नाही त्यातच रस्त्यालगत असलेल्या शेतकरी रात्री-बेरात्री पायदळ जात असतात त्यांनासुद्धा स्वतःचा जीव वाचवत या रस्त्याला मोठी कसरत करावी लागत असते या रस्त्याला कोणी वारसदार आहे किंवा नाही असा प्रश्न जनतेतून व्यक्त केला जात आहे.

   जनतेचे समाधान होत नसल्याने या रस्त्याला काळिमा फासणारी घटना वारंवार होत असताना दिसत आहे तरी शासणाने सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ यांनी बुरहाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुका ते सावदा या दरम्यान रस्त्याची चौकशी करावी व जनतेच्याच जीवाला या दुर्घटनेपासून वाचवावे व लवकरात लवकर साईट पट्याचे काम पुर्ण करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!