तसेच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र, ही आग कशामुळे लागली, याबाबत अद्यापही कारण अस्पष्ट आहे.[ads id="ads2"]
मिळालेल्या माहितीनुसार, गांधीधामकडून (Gandhigram) पुरीकडे (Puri) जाणाऱ्या एक्स्प्रेसला (Express) अचानक भीषण आग लागली. ही आग पॅन्ट्रीच्या डब्याला लागली. परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. मात्र, पॅन्ट्रीच्या डब्यामधून आगीचे धूर मोठ्या प्रमाणात बाहेर येत होते. तसेच स्टेशनवर पोहोचण्याआधीच Gandhigram एक्स्प्रेसला आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवणाचे साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असल्यामुळे त्या ठिकाणी आगीने पेट घेतला. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले.
Fire, that broke out in the pantry car of 12993 Gandhidham-Puri Express, being doused at Nandurbar station in Maharashtra. All passengers are safe. pic.twitter.com/ascysO1WYA
— ANI (@ANI) January 29, 2022