रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील मस्कावद येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस (Savada Police) ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. मुलगी व तिचे कुटुंबिय हे मध्यप्रदेशातील खंडवा (Khandawa) येथील रहिवाशी आहे. कामाच्या निमित्ताने ते मस्कावद परिसरात राहतात. [ads id="ads2"]
१० जानेवारी रोजी रात्री १० वाजता सर्वजण घरात झोपलेले असता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार ११ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस (Savada Police) ठाण्यात नातेवाईकांनी धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सावदा पोलीस(Savada Police) ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करीत आहे.