दिल्ली (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. देशात बहुतांश ठिकाणी गुगल-पे, फोन-पे, पेटीएम यांसारख्या माध्यमाद्वारे होणारे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या काही तासांपूर्वी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे डिजिटल पेमेंटची सुविधा बंद पडल्याचे पाहायला मिळाले.[ads id="ads1"]
दरम्यान, ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’नेही (NPCI) ‘यूपीआय’ सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. तसेच ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल माफीदेखील मागितली.
‘युपीआय सर्व्हर’मध्ये त्रूटी
तांत्रिक अडचणींमुळे ‘युपीआय सर्व्हर’मध्ये काही त्रूटी निर्माण झाल्या होत्या, Regret the inconvenience to #UPI users due to intermittent technical glitch. #UPI is operational now, and we are monitoring system closely.
पण आता सर्व्हर पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले असून, आम्ही संपूर्ण सिस्टीमवर लक्ष ठेवून असल्याचे ‘एनपीसीआय’ने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, ‘आयसीआयसीआय’ (ICICI Bank) बँकेनेही तांत्रिक दुरुस्तीमुळे ‘युपीआय सर्व्हर’ काही काळ डाऊन झाल्याचे म्हटलं आहे.
तात्काळ पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी, युटिलिटी बिल्स भरण्यासाठी प्रामुख्याने ‘यूपीआय’चा वापर केला जातो हे व्यवहार करताना, ग्राहकांना यापूर्वीही अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबाबत असंख्य तक्रारीही आल्या आहेत. प्रत्येक ‘यूपीआय’ मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये व्यवहारांशी संबंधित तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया वेगवेगळी असल्याचे सांगण्यात आले.