"या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 बीड (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था तशी जेमतेमच आहे. जिल्ह्यातील एकमेव केज नगरपंचायत ही काँग्रेसकडे होती. मात्र, काल लागलेल्या निकालात काँग्रेस याठिकाणी तिसऱ्या नंबरचा पक्ष बनला आहे.

अनेकदा निवडणुकीत मोठ्या राजकीय नेत्यांच्या पॅनलचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याचे आपण पाहिले असेल. आता मात्र याहून अधिक कहर म्हणजे बीडच्या शिरूर नगरपंचायतमध्ये चक्क काँग्रेसच्या एका उमेदवाराला शून्य मत मिळालं आहे. [ads id="ads2"]  

  फकीर शब्बीर बाबू असं या उमेदवाराचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतसाठी मतदान झाले. याच्या मतमोजणी निकालामध्ये शिरूर नगरपंचायत गाजली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. यामुळे शिरूर नगर पंचायत ही भाजपाच्या ताब्यात गेली. पण, याठिकाणी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे फकीर शब्बीर बाबू या उमेदवाराला मात्र एकही मत न पडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!