यावल नगरपरिषदेतर्फे व्यासनगरला मोफत पाणीपुरवठा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

दलित वस्तीत सुद्धा मोफत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी

यावल दि.21(सुरेश पाटील) न.प. आगामी निवडणूक लक्षात घेता भावी नगरसेवकांना मतदान होणेसाठी,पोषक वातावरण निर्मितीसाठी यावल नगरपरिषद हद्दीत विकसित भागात फक्त व्यासनगर मध्ये मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला त्या प्रमाणे दलित वस्तीत सुद्धा मोफत पाणी पुरवठा सुरू करून मागील तीन महिन्याची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी यावल तालुका भीम आर्मी तालुकाध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे यांनी व सदस्यांनी केली आहे.[ads id="ads1"] 

            यावल नगरपरिषद मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, जिल्हाधिकार जळगाव,प्रभारी अधिकारी तथा फैजपुर भागाचे  उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगरपरिषद हद्दीतील फैजपुर रोडला लागून असलेल्या व्यासनगर या विकसित कॉलनीत गेल्या तीन महिन्यापासून यावल नगरपरिषदेमार्फत मोफत पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचप्रमाणे आमच्यावर दलित वस्तीत प्रभाग क्र.2 व प्रभाग क्र.5 मध्ये देखील मोफत पाणीपुरवठा सुरू करावा.[ads id="ads2"] 

            तसेच व्यासनगर कॉलनीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मोफत पाणीपुरवठा बाबत पाणीपट्टी घेतली नाही,त्याच प्रमाणे दलित वस्तीतील नागरिकांना नियमानुसार दिलेल्या नळ कनेक्शन धारकांना केलेल्या पाणीपुरवठ्याची तीन महिन्याची पाणीपट्टी देखील माफ करावी.

हेही वाचा :- "या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं? 

   याबाबत केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती आम्हाला आठ दिवसात कळवावी अन्यथा तालुका भिम आर्मी तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावल तालुका भिम आर्मी तालुकाध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे, तालुका उपाध्यक्ष सचिन पारधे, बबलू गजरे,निखिल जोगी,राहुल जयकर यांनी केली आहे.

           प्रभारी अधिकारी आणि मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष ? 

            यावल नगर परिषदेच्या प्रभारी अधिकारी पदी उपविभागीय अधिकारी असल्याने व्यासनगर मध्ये जो  मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.त्या प्रमाणे संपूर्ण यावल शहरात यावल नगरपरिषदे मार्फत मोफत पाणीपुरवठा सुरू केला जाईल का? असा प्रश्न यावलकर यांनी उपस्थित केला असून हा मोफत सुरू केलेला पाणीपुरवठा अनधिकृत असल्यास यावल नगर परिषद पाणीपुरवठा विभाग प्रमुख यांच्यावर यावल नगर परिषद मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आणि प्रभारी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलक हे काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!