सावदा प्रतिनिधी(समाधान गाढे) : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात मस्कावद येथील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 17 रोजी रात्री 11 वाजता घडला. तुषार पांडूरंग इंगळे (मस्कावद, ता.रावेर) (Tushar Pandurang Ingale) असे मयताचे नाव आहे.[ads id="ads1"]
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
मस्कावद येथील छायाचित्रकार (Photografer) असलेला तुषार पांडूरंग इंगळे (Tushar Pandurang Ingale) हा तरुण सोमवारी रात्री सावदा येथे मित्र विशाल वानखेडे (Vishal Wankhede) यांच्यासोबत दुचाकीने आला होता व परतीच्या प्रवासात मस्कावदकडे दुचाकीने निघाला असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. [ads id="ads2"]
यात तुषार हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवले जात असतानाच रस्त्यात त्याची प्राणज्योत मालवली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर सावदा पोलिसात (Savada Police Station) ती वर्ग करण्यात आली.
मस्कावद गावावर पसरली शोककळा
छायाचित्रण व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या तुषार इंगळे या तरुणाच्या मृत्यूनंतर मस्कावद गावावर शोककळा पसरली आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परीवार आहे. दरम्यान, एक महिन्यापुर्वीच तुषारच्या वडिलांचे निधन झाले व त्यातच आता तुषारचा अपघातात मृत्यू झाल्याने व घरातील कर्ता पुरूष काळाने हिरावून नेल्याने इंगळे परीवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तुषारच्या पश्चात आई लताबाई, पत्नी, मुलगा देवांश असा परीवार आहे.

