व्ही. एस. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल रावेरचे पर्यावरणदूत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर येथील व्ही. एस. नाईक कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल यांची रावेर पालिकेने पर्यावरण दूत व स्वच्छ भारत अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. 
[ads id="ads1"] 

 डॉ. दलाल शहरात पर्यावरण व स्वच्छतेबाबत जनजागृती करतील. तत्पूर्वी, पालिकेने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवला आहे.[ads id="ads2"] 

पालिकेतर्फे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासह स्वच्छतेबाबत नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. त्यात विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण व स्वच्छता संबंधित जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येतील, अशी माहिती प्राचार्य डॉ. दलाल यांनी दिली. 

  'माझे शहर सुंदर रावेर' या संकल्पनेवर आधारीत कृती आरखडा प्रकल्पात ५वी ते १२वी, महाविद्यालयीन विद्यार्थी गट व खुला गट अशा प्रकारात स्पर्धा घेण्यात येतील. डिजिटल माध्यमातून 'माझे शहर रावेर माझी जबाबदारी' या विषयावर वक्तृत्व स्पर्धाचे होईल. महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या प्रभागात स्वच्छता स्वयंसेवक म्हणून कार्य करतील.


राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांमार्फत जनजागृती करून रावेर शहराला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य दलाल यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन हेमंत नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!