यावल दि. 2 (सुरेश पाटील) यावल येथे आज शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे काटा पूजन उद्घाटन करताना यावल तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांना डावलून [ads id="ads1"] आपल्या विश्वासातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना आमंत्रित केल्यामुळे यावल तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.[ads id="ads2"]
भरड धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचे निर्णय आणि परिपत्रक कोणत्या प्रकारे आहेत याबाबतची माहिती सुद्धा यावल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भरड धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाला जास्त प्रतिसाद दिला जाणार असल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.

