सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे सकाळी खिर्डी रोडवर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या संगिता विजय पाटील, कल्पना सुभाष पाटील, अर्चना विनोद पाटील,मिराबाई श्रीराम पाटील ह्या सकाळी खिर्डी रोडवरील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर या नेहमी प्रमाणे फिरत होत्या.[ads id="ads2"]
यावेळी शेतातून विळा हातात घेऊन एक विस वर्षीय तरूण समोर आला व विळ्याचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांच्या कडील मंगळसूत्र व कानातील झूमके मागीतली जिवाच्या भितीने महीलांनी दागिने काढून दिले त्यांची किंमत ६३,२०० रुपये आहे हे दागिने घेऊन तो तरूण अंधाराचा फायदा घेऊन फरार केळीच्या शेतातून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उन्नवणे, बिट हवालदार ज्ञानेश्वर चौधरी घटनास्थळी दाखल झाले असून महीला कडून माहिती घेऊन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी व ईश्वर चौहान हे करीत आहेत.

