जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका 45 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads1"]
आठवडाभरापासून सुरू होते उपचार
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठवड्यापासून उपचारार्थ दाखल असलेल्या एका 45 वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीस नाईक भरत चव्हाण पंचनामा केला. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

