यावल तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहीगाव येथील सुरेश आबा नगर यावल रस्त्यावर राहणाऱ्या उच्च शिक्षीत तरूणी सुजाता संतोष पाटील २० वर्ष हिने रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात तिने काही तरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. [ads id="ads2"]
आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल च्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

