बनावट अपंग ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यासाठी रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची टाळाटाळ : तक्रादाराचा बेमुदत उपोषणाचा इशारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

गेल्या सहा महिन्यापासून गाजत असलेल्या बनावट अपंग ग्रामसेवक यांच्या प्रकरणात संबधित ग्रामसेवक यांनी बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे तालुका अंतर्गत बदलीचा लाभ पदरात पाडून घेतल्याचे स्पष्ट झाल्यावर देखील रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केवळ कागदोपत्री घोडे नाचवून कारवाई टाळत असल्याची बाब त्यांनी तक्रारदार श्री. किशोर भिवा तायडे यांना दि ०२/०१/२०२२ रोजी दिलेल्या पत्रात उघड झाली आहे. [ads id="ads2"]  

  अपंग प्रमाणपत्र बोगस असल्याची बाब ऑक्टोबर २०२१ मध्ये म्हणजेच तीन महिण्याआधी उघड झाली असतांना अपंग कल्याण आयुक्त, पुणे यांचेशी पत्रव्यवहारासाठी प्रशासनाला जानेवारी २०२२ का उजाडावा? तसेच श्री शिवाजी सोनवणे, तत्कालीन ग्रामसेवक, वाघोडा खु यांची हृदय शस्रक्रिया झालेली नसतांना,त्यांची एन्जोप्लास्टी झालेली असताना व एन्जोप्लास्टीचा  १५ मे २०१४ च्या शासन निर्णयात कुठेही उल्लेख नसताना गट विकास अधिकारी १९/०३/२००५ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन व १५ मे २०१४ चा शासन निर्णय नजरेआड करून श्री सोनवणे यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे प्रमाणपत्र शिवाजी सोनवणे यांच्या प्रकरणात देतांना दिसत आहेत,त्या मुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रशचिन्ह उभे राहिले आहे. तकरदार श्री किशोर भिवा तायडे मात्र आपल्या उपोषणावर ठाम आहेत, बेमुदत उपोषणांनतर तरी प्रशासनाला जाग येते का? ते पाहणे औसुक्याचे ठरेल.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!