रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दि.05 जानेवारी बुधवार रोजी रावेर पोलीस स्टेशनला कमलाबाई गर्ल्स हायस्कूल रावेर, सरदार जी जी माद्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज रावेर आणि यशवंत विद्यालय रावेर या माध्यमिक विद्यालय व कॉलेज मधील इयत्ता 4थी, 5वी, 7वी, 9वी,10 वी, 11वी, 12वी, च्या विध्यार्थी व विद्यार्थिनींचा वर्ग पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी बोलविण्यात येवून विध्यार्थी व विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज कसे चालते तसेच शस्त्राबद्दल प्राथमिक माहिती देण्यात आली. [ads id="ads1"]
वाहतूक नियमांचे कसे पालन करायला पाहिजे, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टग्राम व इतर इलेक्ट्रॉनिक माद्यमातून सोशल मेडियावर प्रसारित होणाऱ्या अफवावर विश्वास ठेऊ नये. सदर व्हाट्सअप फेसबुक या सोशल मेडीयाच्या माध्यमामुडे आपल्या जीवनावर त्याचे चांगले-वाईट काय परिणाम होतात. याबाबत माहिती समजावून सांगून काही अडचण असल्यास तात्काळ पोलिसांशी सर्पक करावा असे योग्य ते मार्गदर्शन कैलास नागरे पोलीस निरीक्षक रावेर यांनी केले तसेच रावेर पोलीस स्टेशनचे Api/शितलकुमार नाईक, PSI/मनोहर जाधव, यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते व शस्त्राबाबत माहिती व मार्गदर्शन केले. अशा प्रकारे रावेर पोलीस स्टेशनला पोलीस रेझीग डे सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला .[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमास रावेर पोलीस स्टेशन कडील कैलास नागरे पोलीस निरीक्षक रावेर, Api/शितलकुमार नाईक, PSI/मनोहर जाधव, पो. ना./पुरुषोत्तम पाटील, रईसा तडवी महिला पोलीस कॉन्स्टेबल, तसेच 1)सरदार जी जी माद्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज रावेरचे व्ही. के. ठोसर शिक्षक, जे. के. पाटील शिक्षक, बी.डी. पाटील शिक्षक, वाय. पी. महाजन शिक्षक, D.T. चौधरी शिक्षिका, ए. बी. पाटील शिक्षिका व विध्यार्थी-विध्यार्थीनि, 2)कमलाबाई गर्ल्स हायस्कूल जयंत कुलकर्णी मुख्याध्यापक, पी. वी. पाटील शिक्षक, व्ही. ऐ. चौधरी शिक्षक, एन. आर. भालेराव शिक्षीका, ए. डी. महाजन शिक्षीका व विद्यार्थिनी, आणि 3) यशवंत विद्यालय रावेरचे S.D. इंगळे शिक्षक, निलेश चौधरी शिक्षक, S.N. पाटील शिक्षक, चंद्रकांत पारधी शिक्षक, S.H. तडवी शिक्षिका, H. H. भालेराव शिक्षिका व विध्यार्थी-विध्यार्थिनी उपस्थित होते.

