रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते व रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. शिरीष दादा चौधरी यांचे कट्टर समर्थक संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे यांना नवी दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे १५ ते २० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुले राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रीय फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फार्मर युनियन जस्टीस डॉ. सत्यनारायण जतिया, डॉ. एम.एल. रंगा, डॉ. सोहनपाल सुमानाक्षर, आर.आर. बंग , प्रा. संजय मोरे, अमरीश सगी, यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. [ads id="ads2"]
सामाजिक कार्यकर्ते धुमा भाऊ तायडे यांचे लोकप्रिय आमदार श्री. शिरीष दादा चौधरी व शेखर दादा बडगे, रावेर नगरीचे मावळते लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मो. जफर मो. व निळे निशाण सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर व निळे निशाणचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाऊ अग्रवाल, मा. नगराध्यक्ष हरिष गनवाणी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे रावेर तालुका अध्यक्ष अ.जा. विभाग प्रमुख सावन भाऊ मेढे, मा. नगरसेवक अड. योगेश गजरे, रामदास लहासे, धनराज घेटे, महेंद्र वानखेडे, प्रदीप महाजन, सचिन तायडे, समाधान तायडे, गोविंद लहासे, अमर तायडे, दिलीप लहासे, संकीत तायडे, नगीन तायडे, प्रताप घेटे, रुपेश गाढे, शुभम घेटे, संतोष तायडे, बाळू तायडे, दीपक तायडे यांनी सत्कार केला. या पुरस्काराबद्दल जळगाव जिल्हाभरातून संघरक्षक उर्फ धुमा भाऊ तायडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

