चोपडा : 37 वर्षीय अपंग महिलेच्या असायतेपणाचा फायदा घेत अत्याचार करण्यात आला व यातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर या महिलेने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील (Chopda Taluka) एका गावात घडली.[ads id="ads1"]
या प्रकरणी संशयीत आरोपी असलेल्या मेहुण्यासह इतर तीन जणांविरोधात अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Adawad Police Station) करण्यात आला.[ads id="ads2"]
घटनेने परिसरात उडाली खळबळ
चोपडा तालुक्यातील (Chopda Taluka) एका गावात 37 वर्षीय (37Year Woman) महिला आपल्या भावासह वास्तव्याला आहे. महिला ही अपंग असल्याने ती भावाकडे राहते. दरम्यान, तिच्या मेहुण्यासह इतर तिन जणांनी या तिन भावांनी अपंगपणाचा फायदा घेत पीडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून महिला 6 महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने सोमवार, 24 जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात (Adawad Police Station) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक किरण दांडगे करीत आहे.

