रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे रावेर तालुक्यातील ८ ग्रामसेवकांनी स्वइच्छेने आपल्या सोयीनुसार बदलीचा लाभ करून घेतल्या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकांची चौकशी होऊन ८ पैकी ५ ग्रामसेवक दोषी आढळून आलेले असून सुद्धा दोषी ग्रामसेवकांवर अजूनही कार्यवाही झालेली नसून,[ads id="ads2"] संबंधीत ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर हे करत आहे. दोषींवर कारवाई व्हावी यासाठी दिव्यांग संघटनेने आज दिनांक २६/०१/२०२२ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पंचायत समिती रावेर येथे आंदोलन सुरू केले आहे.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ग्रामसेवकांवर कारवाईच्या मागणीसाठी रावेरमध्ये दिव्यांग संघटनेतर्फे उपोषण
बुधवार, जानेवारी २६, २०२२
Tags