यावल दि.26(सुरेश पाटील) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9:15 वाजता तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सातोद रोड यावल येथील प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम शासकीय समारंभ आयोजित केलेला आहे [ads id="ads1"]
या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अशा प्रार्थनीय टिप पत्रिकेवर तहसीलदार यावल यांनी टीप 1) सर्वांनी शासकीय पोशाखात यावे2)सामाजिक अंतर सोशल डिस्टंसिंग ठेवण्यात यावे )3 मास्कचा वापर करावा असे नमूद करून उपस्थिती प्रार्थनीय आहे असे म्हटले आहे.[ads id="ads2"]
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय समारंभ कार्यक्रम तसेच देश हिताच्या दृष्टीने यावल तहसीलदार महेश पवार यांनी सर्वांना जी टीप देऊन सर्वांनी शासकीय पोशाखात यावे असे नमूद केले त्याबाबत मात्र उपस्थित राहणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून उपस्थितांनी नेमक्या कोणत्या पोशाखात यावे तसेच ही टीप महसूल मधील शासकीय अधिकारी,कर्मचारी, शिपाई यांच्यासाठी किंवा नागरिकांसाठी आहे का?आणि असेल तर याबाबत आतापर्यंत त्याचे पालन करण्यात आले आहे का? ईत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत यावल तहसीलदार महेश पवार यांनी दिलेल्या टिप संदर्भात जनतेच्या माहितीसाठी जाहीर खुलासा करावा अशी मागणी सुरेश जगन्नाथ पाटील पत्रकार यावल तथा अध्यक्ष-भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास( आदरणीय अण्णा हजारे कृत)जळगाव जिल्हा यांनी केली आहे.