ज्योती विलास लहासे (विटवा, ता.रावेर) या विवाहितेने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे मात्र मयत महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याचा दावा मयताच्या वडिलांनी यावेळी केला. या प्रकरणाची सकल पोलीस चौकशी करण्याची मागणी मयत विवाहितेचे वडील अरुण जगन्नाथ अढळे व निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केली.[ads id="ads2"]
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
या पत्रकार परीषदेला जिल्हा नियोजन समितीचे महेश तायडे, रावेर तालुका सरचिटणीस सुधीर सैगमिरे, रावेर तालुका उपाध्यक्ष अनिल वाघ-धनगर, कार्याध्यक्ष शरद बगाडे, संघटक जलील खान, तालुकाध्यक्ष दीपक लोहार, शहराध्यक्ष महेंद्र महाले, एकनाथ अडागडे, बिललाला अडागडे, रोशन अडागडे, कवीस ससाने आदी उपस्थित होते.
विवाहितेसोबत अतिप्रसंग झाल्याचा आरोप
पत्रकार परीषदेत निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर व अरुण अढळे यांनी सांगितले की, 28 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ज्योतीला फोन आला. यानंतर ती शौचास जात असल्याचे सांगून बाहेर पडली मात्र घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याबाबत नोंद करण्यात आली मात्र त्यानंतर 31 डिसेंबर रोजी ज्योतीच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी दिली. त्या दिवसापासून दीपक मनोरे हा ज्योती संदर्भात माहिती गोळा करीत असल्याचे समजले तसेच दीपक मनोरे याने 25 डिसेंबर रोजी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांनी केला.
या मागण्यांबाबत पोलिसांनी घ्यावी दखल
विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघा संशयीतांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, मयताच्या मोबाईलचा मागील सहा महिन्यांचा सीडीआर तपासावा, लोकेशन आणि रुटची माहिती मागवुन विश्लेषन करावे, मयताच्या गावी विटवे येथे बारकाईने गुप्त चौकशी करून घडलेल्या घातपाताबाबत माहिती काढावी, अशी मागणी अरुण अढळे व निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केली