नायलॉनच्या मांजाने दुचाकीवरील युवकाचा गळा चिरला ; वरणगाव जवळील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 वरणगावात मांजा सर्रास विक्री उडत्या पक्षांचे जीव धोक्यात

वरणगाव : जीवघेण्या चायना मांजावर शासनाने बंदी घातलेली असताना सुद्धा वरणगाव येथे सर्रास विक्री होत आहे. या चायना मांजामुळे येथील एका विटभट्टीवरील ४२ वर्षीय मजूराचा गळा चीरून गंभीर जखमी झाल्याची घटना मकर संक्रातीच्या दिवशी घडली. तर असंख्य ठिकाणी विविध पक्षी या मांजात अडकून मृत्यूमुखी पडत आहेत. तरी पोलिसांसह नगर परिषदेने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.[ads id="ads1"] 

शासनाने या घातक आणि जिवघेण्या नायलॉनच्या चायना मांजावर बंदी घातली असतांना वरणगाव येथे सर्रास चायना मांजाचे रीळ सहजरीत्या दुकानदार उपलब्ध करून देत आहे. या मांजामुळे पक्षी तर जखमी होत आहेत. परंतु पतंग उडवताना अनेक दुचाकीस्वारांचा गती मूळे क्षणात गळा कापला जाऊन गंभिर जखमी तर काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत. [ads id="ads2"] 

  अलीकडेच येथील गणेश काळे या विटभट्टी व्यवसायीकाकडे मजूर म्हणून रवि कोळी (वय ४२) रा. वढोदा ता. यावल कुंटूबासह मजूरीला आहे. (ता. १४ ) शुक्रवारी रवि कोळी फुलगाव कडून वरणगाव कडे विटभट्टीवर मजूरी करीता मोटर साईकलवरून येत असतांना सकाळी १० वा दरम्यान हॉटेल आस्वाद जवळ लिंबाच्या झाडावर पतंगचा मांजा अटकला होता. मांजा मोटर सायकल वरील रवी कोळी यांना दिसला नसल्याने त्यांच्या गळा चिरला गेल्या मुळे गंभीर जखमी झाला. त्यांला वरणगाव येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील आठवडयात मांजाने गळा कापल्यामुळे एक लहान मुलगा देखील जखमी झाल्याची घटना घडली आहे. 


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!