जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) परिवारासह चिमुकलेही आंदोलनात फलक घेवुन सहभागी भीक मागुन जमा झालेली रक्कम शासनाला देणार गेल्या 80 दिवसापासून जळगाव (Jalgaon) एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. [ads id="ads1"]
एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव (Jalgaon) एसटी आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी एसटीच्या विभागीय कार्यालया पासून एसटी स्थानकापर्यंत भीक मागून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. [ads id="ads2"]
एसटी वर्कशॉप (ST Workshop) पासून ते नवीन बसस्थानकापर्यंत (Jalgaon Bus Stop) किमान तीन ते चार किलोमीटरपर्यंत रस्त्यावर बस कर्मचार्यांनी (स्त Worker) दुकानदार असो की पादचारी वाहनधारक सर्वांनाच भीक मागितली. या अनोख्या आंदोलनातून एसटी (ST) कर्मचार्यांनी शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलाय.
हेही वाचा :- धक्कादायक : आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; यावल तालुक्यातील घटना
अडीच ते तीन वर्ष वयाचे चिमुकलेही आपल्या कर्मचारी पित्यासह आईसोबत या आंदोलनात सहभागी झाले होते. भीक मागून जमा झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येणार असून आता तरी सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष देईल का ? असा संतप्त सवाल उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.