महिलेच्या मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय ; सुकळी घटनेचा योग्य तपास करा - निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 महिलेच्या मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय 

सुकळी घटनीची योग्य तपासाची  निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

सुवर्ण दिप वृत्तसेवा (राहुल डी गाढे) मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी शिवारातील वडोदा वनक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर ४४१ व ४४२ मधील पाण्यात ३१ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला होता. यासंदर्भात घातपाताचा संशय निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ४८ तासांत योग्य तपास न केल्यास निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की,दिनांक २८ रोजी ज्योती विलास लहासे (वय ३१) हिची हरवल्याची तक्रार महिलेचा मावसभाऊ कैलास तायडे (रा. खामखेडा) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दाखल केली होती. सदर महिला २५ डिसेंबर रोजी मावस भावाच्या घरी लग्नसमारंभासाठी रावेर तालुक्यातील विटवे येथून आलेली होती.[ads id="ads2"] 

२६ रोजी दुपारी साडेबारा वाजे च्या सुमारास शौचास जाते, असे सांगून गेली होती. मात्र थेट ३१ रोजी सायंकाळी तिचे प्रेत "सुकडी" वन विभागाच्या एका नाल्यात आढळून आले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी दिपक मनोरे व सुकलाल वाघ या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


निळे निशाण सामाजिक संघटनेद्वारे उपस्थित केले प्रश्न

१) महिलेच्या शवविच्छेदन अहवालाआधीच हा गुन्हा दाखल केला असून ज्या ठिकाणी घटना घडली आहे. त्या ठिकाणी एकटा मनुष्यसुद्धा जाणार नाही एवढे घनदाट जंगल आहे. केवळ पाच ते साडेपाच फूट पाणी या नाल्यांमध्ये साचलेले आहे, रस्त्यात तीन विहिरी असताना व दोन किलोमीटरवर पूर्ण नदी असताना आत्महत्या करण्यासाठी घनदाट जंगलाची निवड करणे याचाच अर्थ यामध्ये घातपाताचा संशय निर्माण होत आहे.

२) लगेचच शेवटचे लोकेशन घेऊन तपास केला असता तर कदाचित महिला जिवंत आढळून आली असती. तपासात दिरंगाई केली 

३) ४ दिवस महिलेचे प्रेत पाण्यात असूनही कुजलेले नव्हते याचाच अर्थ तिला एक दिवस किंवा दोन दिवस आधी त्या ठिकाणी मारलेले असावे अशी शंका येत आहे. पोलिसांनी ३१ तारखेलाच डॉग स्क्वॉड आणणे अपेक्षित असताना १ जानेवारीला श्वानपथक आणले यातही पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केला आहे.

  या प्रसंगी रावेरचे निळे निशाण सामाजिक संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष शरद बगाडे, उपाध्यक्ष नारायण सवर्णे,अनिल धनगर, जलील खान, रोहित बाविस्कर, ब्रिजलाल अढागळे, मयत महिलेचा मावसभाऊ कैलास तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!