रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) माध्यमिक शिक्षक पतपेढी च्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यात अध्यक्ष पदी छाया सुनिल महाजन, उपाध्यक्षपदी गोपाळ त्र्यंबक पाटील, चिटणीस (सचिव) पदी किशोर विश्वनाथ चौधरी, तर खजिनदारपदी प्रविण काशिनाथ सोनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. [ads id="ads2"]
निवडीनंतर मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष(State President) जे.के.पाटील, ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, जिल्हा मुख्याध्यापक(District Headmaster) संघाचे एन. व्ही पाटील, रावेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ललित चौधरी, सरदार जी.जी.हायस्कूलचे (Sardar G G High School) प्राचार्य शिरिष वाणी, पॅनल प्रमुख एस टी महाजन यांनी सर्व माध्यमिक शिक्षक पतपेढी चे सर्व नवनिर्वाचित संचालक तसेच कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार केला.