नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 🔹 राष्ट्रीय मतदार दिनी होणार सन्मान...

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव येथील तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.[ads id="ads1"] 

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगाव येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे, असे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.[ads id="ads2"] 

   सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धरणगाव जि. जळगाव यांनी आगामी जि.प. आणि न.पा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुणीही मतदार वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रम तालुक्यात राबवले. यामध्ये नवमतदार जे १८ वर्ष पूर्ण केले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी केली. जनजागृती रॅली काढून तालुक्यात  सर्वांना प्रेरित केले. लोकशाही बळकट होण्यासाठी शाळा कॉलेज मध्ये जाऊन EVM मशिन चे प्रात्यक्षिक दाखविले. विद्यार्थी - विद्यार्थिनी यांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्रमाणपत्र वितरित केले. नमुना 6,7, 8, 8अ फॉर्म्स BLO (BOOTH LEVEL OFFICER) यांचे मार्फत भरून घेतले. कोरोना काळात ONLINE फॉर्म भरून घेतले. ZOOM मिटिंग द्वारे प्रशिक्षणावर भर देऊन तालुका प्रथम क्रमांकावर आणला. या सर्व बाबींची दखल जिल्हास्तरावर घेतली गेली व हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिनी होणार आहे. शेतकरी, कष्टकरी, आबालवृद्ध, महिला, विद्यार्थी या सर्वांची कामे प्राधान्यक्रमाने करणाऱ्या देवरे साहेबांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार असल्याचे कळले तेव्हापासून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!