अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करणेसाठी भिम आर्मी तर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल दि.5(सुरेश पाटील)यावल तालुक्यातून वाहन क्रमांक नसलेल्या तसेच अदृश्य पद्धतीने नंबर प्लेट असलेल्या डंपर वाहनांच्या माध्यमातून अवैध वाळू तसेच गौण खनिज अनधिकृतपणे वाहतूक सर्रासपणे सुरू आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी यावल तालुका भिम आर्मी तर्फे फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

        भिम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे,जिल्हा संघटक हेमराज तायडे,तसेच सदस्य सचिन पारधे,बबलू गजरे, निखील जोगी,जितू तायडे,रोहित तायडे यांनी उपविभागीय अधिकारी फैजपूर[ads id="ads2"]  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यात भुसावळ-यावल, चोपडा-यावल,भुसावळ-फैजपुर  महामार्गावरून तसेच इतर रस्त्यांवरून अवैध वाळू व इतर गौण खनिजाची सर्रासपणे अनधिकृतपणे सुसाट वेगाने पंचवीस ते तीस डंपर वाहनांच्या माध्यमातून यापैकी काही वाहनांवर वाहन क्रमांक नाहीत तर काही वाहनांचे वाहन क्रमांक अदृश्य न दिसणारे आहेत अशा परिस्थितीत गौण खनिज अवैध वाहतूक सुरू आहे.अशा वाहनांची चौकशी व कार्यवाही करण्यासाठी महसूल,पोलिस,आरटीओ यांचे संयुक्त पथक नियुक्त करून अवैध गौण खनिज वाहतूक दारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तरी फैजपुर भाग उपविभागीय अधिकारी कैलास हे ठोस निर्णय घेऊन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!