यावल दि.10(सुरेश पाटील) यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक डंपर वाहन चालक/ मालकांवर कारवाई होत नसल्याने तसेच अवैध वाळू वाहतूकीत काही ठराविक ट्रॅक्टर पकडून नाम मात्र कारवाई अनिमितपणे सुरु असल्याने तालुक्यात बांधकाम साहित्य विक्रेत्यांमध्ये नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
तसेच अवैध वाळू वाहतूक इ मधील डंपर ट्रॅक्टर या वाहनांवर दर्शनी भागावर किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी वाहन क्रमांक नसल्याने आरटीओ तपासणी निरीक्षक यांच्या कारवाईबाबत सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे.[ads id="ads2"]
यावल महसूल कार्यक्षेत्रात साकळी,थोरगव्हाण,मनवेल,शिरागड तसेच सातपुडा वन क्षेत्र परिसरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरून यावल महसूल यंत्रणेच्या नाकावर टिच्चून अवैध वाळू वाहतुकीचे अदृश्य आणि बिना क्रमांकाचे डंपर,ट्रॅक्टर सुसाट वेगाने बिनधास्तपणे धावत आहेत यात काही ठराविक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकांना सोडून देण्यात येत आहे तर काही ट्रॅक्टर चालक मालकांवर नाम मात्र कारवाई कायदेशीररित्या दाखविण्यात येत आहे.काही अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर चालक मालकांवर गेल्या दीड दोन वर्षात अद्याप कारवाई झालेली नाही.तसेच यावल तालुक्यातुन 20 ते 25 अवैध वाळू वाहतुकीचे डंपर अदृश्य किंवा वाहन क्रमांक नसलेले डंपर अवैध वाळू वाहतूक व इतर गौण खनिज सर्रासपणे वाहतूक करीत आहेत त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने महसूल यंत्रणेबाबत मोठा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ यांच्या अटी शर्तीनुसार वाहनाच्या दर्शनी भागावर वाहन क्रमांक नंबर प्लेट स्पष्ट आणि ठळक अक्षरात लावणे बंधनकारक असताना सुद्धा यावल तालुक्यात अनेक अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन क्रमांक दिसून येत नसल्याने याकडे आरटीओ निरीक्षक आणि चौकशी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
यावल शहरासह तालुक्यात अनेक महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असताना अवैध वाळू वाहतूकीची आणि इतर अनधिकृत वाहतुकीची वाहने सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत नाहीत का? याबाबत महसूल यंत्रणेचे आणि संबंधितांचे कोणत्या कारणांमुळे दुर्लक्ष होत आहे याबाबत सुद्धा नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.