यावल दि.10( सुरेश पाटील) यावल शहरात आणि विकसित भागात ठीक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत संबंधित बांधकाम करणारे बांधकाम साहित्य सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर बेमुदत ठेवत असल्याने वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहेत याकडे यावल नगर परिषद मुख्याधिकारी आणि यावल नगर परिषद बांधकाम शाखा अभियंता यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
यावल शहरात बांधकाम साहित्य सार्वजनिक रस्त्यावर;वाहतुकीस अडथळा मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष.
सोमवार, जानेवारी १०, २०२२