जुगार अड्डयावर छापा : १२ जणांवर कारवाई ; रावेर तालुक्यात खळबळ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) : तालुक्यातील चोरवड येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा मारून १२ जणांवर कारवाई केली आहे.[ads id="ads1"] 

या संदर्भात वृत्त असे की, चोरवड येथील राजेश रमेश घेटे यांच्या घराच्या मागे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती.

या अनुषंगाने Raverपोलीस निरिक्षक नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शीतलकुमार नाईक, कर्मचारी विशाल पाटील, सुरेश मेढे, सुकेश तडवी, समाधान ठाकूर, प्रमोद पाटील, अमोल जाधव, विकार शेख यांच्या पथकाने हा छापा टाकला.[ads id="ads2"] 

या छाप्यात १२ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये बर्‍हाणपूर येथील हमीदनूर अबिदनूर, दाऊद पुरा मोहल्ला, जाकीरअली अब्बासअली, मोमीनपुरा, सय्यद रशिदमीर सय्यद राजिकमीर, खैराती बाजार पोलिस लाइनजवळ, मेहताब अहमद मोहम्मद हारूण, हमीदपुरा, अब्दुल मजीद अब्दुल रशीद, नया मोहल्ला, सालईवाली मस्जिदजवळ, रियाजउद्दीन सिराजउद्दीन, बेरीमैदान, गुलजार अहमद अब्दुल जब्बार अन्सारी, मोमीनपुरा, रिसालोद्दीन निजमोद्दीन, दौलतपूर सय्यदनगर, सुकदेव किसन साळवे, इंदिरा कॉलनी, चिंतामणी चौक, बर्‍हाणपूर, शेख शरिफोद्दीन शेख रफीउद्दीन कर्जोद, ता.रावेर, शेख आरिफ शेख हमीद, मदिना कॉलनी, रावेर व हर्षकुमार रमेश घेटे, चोरवड यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये ५० हजार रुपये किमतीच्या दुचाकी, सात मोबाइल व रोकड असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!