रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) अनधिकृत वीज कनेक्शन वीज कर्मचाऱ्याने तोडल्या प्रकरणी वीज कर्मचाऱ्यास मारहाण केल्या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रावेर येथील वीज कनेक्शन तोडल्याचा राग येवून वीज कर्मचाऱ्यांला मारहाण प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल कर्मचारी नामे सतीश सांगळे रा.भोर रावेर रेल्वे स्टेशन यांनी मनोज दत्तात्रय पाटील (रा.भगवती नगर,रावेर) यांचे अनधिकृत वीज कनेक्शन तोडल्याने,कल्पेश पाटील यांच्या फोनवर शिवीगाळ व दमदाटी केली.[ads id="ads2"]
याबाबत सांगळे व कल्पेश पाटील दोन्ही शनिवारी सायंकाळी ५.३० वा.विचारपूस करण्यासाठी रावेर येथील छोरिया मार्केटमध्ये श्रीहरी फर्टिलायझर या दुकानावर विचारणा करण्यासाठी गेले असता,मनोज पाटील यांनी शिवीगाळ,दमबाजी करत चापटा बुक्यांनी तोडांवर,नाकावर,छातीवर मारहाण केली.
शासकिय कामात अडथळा निर्माण आणला म्हणुन वीज कर्मचारी सांगळे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील रावेर पोलीस स्टेशनचे पो.नि.कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितलकुमार नाईक करत आहे.