रावेर तालुक्यातील विवरे खुर्द ग्रा.पं.च्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांची चौकशी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या दप्तर गहाळ  प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून तत्कालीन सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचे जबाब चौकशी समितीने घेतले आहे.[ads id="ads1"] 

रावेर येथील पंचायत समितीत बुधवारी दुपारी गटविकास अधिकारी चोपडा भरत कोसोदे, विस्तार अधिकारी जे पी पाटील, क्लार्क सुरवाडे यांनी तत्कालीन सरपंच कविता पाटील, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार यांची चौकशी करून, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी आर महाले यांचा जबाब नोंदवला आहे. [ads id="ads2"] 

  त्यानंतर विवरे खुर्द ग्रामपंचायतीत  चौकशी पथक गेले होते. तेथून काही महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. ग्रामपंचायतीचे महत्वाचे दप्तर गहाळ झाले असून, या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्यात आहे. चोपडा येथील गटविकास अधिकारी भरत कोसोदे हे चौकशी करत आहे.

हेही वाचा :- "या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं? 

ग्रामपंचायतीचे कर मागणीचे रजिस्टर व भरणा पावतीचे बुक गहाळ आहे. त्याअनुषंगाने चौकशी सुरु आहे. या दप्तर गहाळ प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. दरम्यान रावेर पंचायत समितीत चौकशी सुरु होती त्यावेळी काही विद्यमान सदस्य उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!