मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी आयु. भिमराव पोहेकर हे एक गरीब मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतांना मुलगा डॉ. राजरत्न भिमराव पोहेकर यांना शिक्षणासाठी कधीही काही आर्थिक बाबतीत कमी पडू दिले नाही. [ads id="ads1"]
लहान पणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या राजरत्न पोहेकर यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे घेऊन (अर्थशास्त्र) एम.ए. ही पदवी प्राप्त करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे (पीएच. डी.) साठी प्रबंध सादर केला. अभ्यासक्रम पूर्ण केला. [ads id="ads2"]
त्यात प्रावीण्य मिळवून १३ जानेवारी या दिवशी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने राजरत्न भिमराव पोहेकर यांना पीएच. डी. ही पदवी प्रदान करून त्यांचा गौरव तथा सन्मान केला. डॉ. राजरत्न पोहेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. डॉ. राजरत्न पोहेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून काका आयु दिलीप पोहेकर बौद्धाचार्य सामाजिक आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, अशोक पोहेकर, विठ्ठल पोहेकर, सुशील पोहेकर, उज्ज्वल पोहेकर, मुक्ताईनगरचे माजी पोलीस पाटील मोहन मेढे, बौद्धाचार्य विश्वनाथ मोरे, वलभ पानपाटील, किशोरपान पाटील, विनोद पानपाटील, विजय पानपाटील, निलेश मेढे, संदेश पानपाटील, विकी पानपाटील, आदी मान्यवर व मित्र मंडळीनी अभिनंदन केले.

