रावेर : भाजपा आपली माझी निष्ठा असून पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरू अन्यथा नाही मात्र भाजपात असताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देखील आपण खुप मानतो, असे रावेर पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन म्हणाले.[ads id="ads1"] दरम्यान, खडसेंनी भाजपा सोडून आता राष्ट्रवादीत प्रवेश केला असून एकीकडे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे मात्र दुसरीकडे पक्ष बंधनामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या असतानाच आगामी काही महिन्यांवर पंचायत समितीच्या निवडणुका येवून ठेपल्याने सदस्य मात्र दुहेरी मनस्थितीत अडकलेले दिसून येत आहेत.[ads id="ads2"]
सदस्यांची दुहेरी मनस्थिती
आगामी काळात पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. भाजपाच्या योगीता वानखेडे यांनी आधीच नाथाभाऊंवर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर रावेर-यावल-मुक्ताईनगर तालुक्यातील नाथाभाऊ यांना मानणारे अद्यापही भाजपात असलेतरी त्यांची मनस्थिती दुहेरी झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, माझ्यावर प्रेम करणारे योग्य वेळी राष्ट्रवादीत येतील व ते निवडणुकीत विजयी होऊन पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल यात शंकाच नाही. लवकरच मी रावेर तालुक्यातील सर्व गटामंध्ये दौरे करणार असून कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत.