पत्रकारांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे वतीने रावेर तहसिलदार यांना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) आज दि. २४  जानेवारी  सोमवार रोजी  रावेर तहसिलदार यांना पत्रकारांवर  झालेल्या अन्यायाच्या विरोधात  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे वतीने निवेदन देण्यात आले . [ads id="ads1"] 

       राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नागपुर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे ग्रामीण व दैनिक महाभारत सतीष भालेराव यांना हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी जिवे मारण्याची धमकी देत मारहान केली .[ads id="ads2"] 

   तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या धाडसी पत्रकार संदेश कानू व पत्रकार सय्यद फैजान यांच्यावर तीस ते चाळीसगाव गुडांनी प्राणघातक हल्ला केला व पत्रकारांच्या जवळील वृत्तांकन करण्यासाठीचे अंदाजे 80 हजार रुपयांचे साहित्य लुटुन नेले .

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला असुन याबाबत पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 सुधारणा 2019 अन्वये त्वरीत कारवाई करण्यात यावी व पिडीत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी  मागण्यांसाठी तहसिल यांना निवेदन देवुन निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व पत्रकार संरक्षण समितीचे पत्रकार साकीर खॉन, प्रदीपराज महाराज , ईश्वर महाजन , भिमराव कोचुरे आदी पत्रकार उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!