पाल घाटात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण ;सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी, वाहनधारकांमध्ये दहशत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  सावदा येथून जवळच असलेल्या पाल (बोर) घाटातील वाढते गुन्हे रोखण्यासाठी परिसरातील नागरिकांकडून परिसरात या सीसीटीव्ही कॅमेरे (cctv camere) बसविण्याची मागणी केली जात आहे.[ads id="ads1"] 

आमोदा भिकनगाव (भुसावळ-चित्तोडगड) Bhusawal-Chitodgad हा ४० किमीचा रस्ता भारत सरकार व राज्य शासनाच्या योजनेतून हायब्रीड कम्युनिटी अंतर्गत शंभर कोटी खर्चून नव्याने रस्ता तयार झाला आहे. शेजारी असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातून पुढे जळगाव, भुसावळ, औरंगाबादसाठी तर भुसावळ विभागातून इंदोर (Indore) येथे जाण्यासाठी या महामार्गाला पसंती आहे. [ads id="ads2"] 

  दरम्यान हा रस्ता पुढे ब्रिस्टन व खरगोन मार्गे मुंबई-आग्रा(Mumbai-Agra) महामार्गला मिळत असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी व उत्तर भारतातून महाराष्ट्र येण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ या महामार्गाने सुरू झाली आहे.

  या रस्त्यावर आधीच रस्तालूट, दरोडे, हत्या करून मृतदेह फेकून देणे... असे प्रकार घडले आहेत. काही दिवसाआधी याच रस्त्यावर सावदा(Savda) येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचा परिवार ओंकारेश्वर येथून दर्शन घेऊन येत असताना यांच्या गाडीवर देखील अज्ञातांनी दगडफेक केली होती. यात गाडीचे नुकसान झाले होते.

  या छोट्या-मोठ्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची तपासात मोठी दमछाक होत असते. या रस्त्यावर कॅमेरे (Camere)बसवल्यास गुन्हेगार व गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना चाप बसेल, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

  १ फेब्रुवारी २१ रोजी वरणगाव येथील चांगो झोपे या वृद्ध व्यक्तीची त्यांच्याच साथीदारांनी या भागात हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची घटना घडली होती. या घटनेच्या वर्षभर आधी अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते. त्या प्रेताबाबत अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे वनविभाग, गृहविभाग, बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून या रस्त्यावरील चिचाटी फाट्याजवळ तसेच पालकडून सावद्या कडे येणाऱ्या नाक्यावर देखील कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

  "पाल घाटात कॅमेरे बसवल्यास दळणवळण करणाऱ्या प्रत्येकावर सहज लक्ष ठेवणे शक्य होईल. गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. याबाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करू"

- डी. डी. इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक, सावदा पोलीस स्टेशन

"संबंधित यंत्रणेने वन विभागाच्या नाक्यावर कॅमेरे बसवावे. शक्य असेल ती मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करू"

ए. बी. शेख, कार्यकारी अभियंता, सा. बा. उत्तरविभाग, जळगाव



#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!