डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल दि.24(सुरेश पाटील)

आज दि.24 रोजी यावल तालुक्यातील कोळवद येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते.शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी योग्य सल्ला व मार्गदर्शन करून डोळ्यात मोतीबिंदू आढळल्यास रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रक्रियेची तारीख देऊन रुग्णाची अनुभवी तज्ञा मार्फत शास्त्रक्रिया करण्यात आली.[ads id="ads1"] 

  तसेच डॉ.कुंदन दादा फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची,राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली या शिबिरात एकूण १७६ नेत्र रुग्णांची  तपासणी व २० रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्द यांनी मार्गदर्शन केले.व नेत्र चिकित्सक जॅकी शेख यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.[ads id="ads2"] 

  या वेळी हर्षल पाटील व डॉ. कुंदन फेगडे यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे उद्धघाटन हर्षल पाटील(भाजपा जिल्हा सरचिटणीस)यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले या वेळी युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे,याकूब तडवी(सरपंच कोळवद),शशिकांत चौधरी उपसरपंच कोळवद,),ललित पाटील(उपसरपंच सातोद), पांडुरंग पाटील(माजी सरपंच), अनिल पाटील,प्रल्हाद चौधरी,  युवराज देसालडे,मिनाक्षीताई भिरूड,भगवान पाटील,पद्माकर महाजन,आशिष मोरे,सचिन फेगडे भगवान बर्डे आदींची  उपस्थिती होती या कार्यक्रमाला हेमंत पाटील,परेश फेगडे,सागर लोहार,तुषार चौधरी,मनोज बारी,  विशाल बारी,हर्षल सोनवणे, तीर्थराज भिरूड,अक्षय पाटील आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!